काँग्रेसच्या 'छोले भटुरे' आंदोलनाला भाजपकडून 'सँडविच-वेफर्स-बर्फी'च उत्तर

पुणे : उपोषणाच्या नावाने देशभरात सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून सामान्य जनतेचा खेळ चालू आहे का असच काहीस चित्र आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणा दिवशी पोटभर ‘छोले भटुरे’ खाऊन उपोषणाचा श्रीगणेशा केला होता तर आज स्वतःला ‘सच्चाग्रही’ समजणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी दबाके ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’वर ताव मारला.
पुण्यात जिल्ह्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेसंबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पुण्याचे दोन आमदार भीमराव तापकीर आणि बाळा भेगडे हे देखील उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. परंतु आमदार भीमराव तापकीर आणि बाळा भेगडे हे दोन्ही आमदार समोर ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’च्या प्लेट्स आल्यावर ‘सच्चाग्रही’ आंदोलन विसरले आणि बैठकीदरम्यान प्लेट मधील सर्व ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’ फस्त केली आणि उपोषण सोडले.
काँग्रेसच्या छोले-भटुरे उपोषणाचा देशभर हश्या झाला असताना, भाजपच्या ‘सच्चाग्रही’ आंदोलनाचा सुद्धा ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’ने घात केला आहे. त्यामुळे त्यावर काँग्रेस आता प्रतिक्रिया देणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. पक्षाच्या सक्त सूचना असताना सुद्धा पुण्याचे दोन आमदार भीमराव तापकीर आणि बाळा भेगडे यांनी ‘सच्चाग्रही’ आंदोलनाचा फज्जा उडवला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं