आगामी निवडणुकीपूर्वी सर्व पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा, अन्यथा तुमचा पेट्रोल पुरवठाच बंद करू

नवी दिल्ली : आगामी निवडणुकीपूर्वी सर्व पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळ जनक दावा भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेने केला असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे. त्यामुळे केंद्राकडून सरकार कडून २०१९ पूर्वी पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा यासाठी दबाव वाढत असून प्रमोशनसाठी जाणीवपूर्वक हे प्रकार केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यास नकार दिलात तर तुमचा पेट्रोल पुरवठाच बंद करू अशी थेट धमकी वजा इशाराच देण्यात आल्याचा दावा भारतीय पेट्रोलियम डिलर्स संघटनेचे अध्यक्ष एस.एस. गोगी यांनी केला आहे. संघटनेने थेट केंद्र सरकारवर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे इंडियन ऑईल कॉर्पौरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पौरेशन लिमिटेड तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पौरेशन लिमिटेड या सर्वच सरकारी कंपन्यांकडून दबाव आणला जात असल्याचं एस.एस. गोगी म्हणाले आहेत. सरकार इतक्यावरच थांबले नसून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना देऊ केलेल्या एलपीजी कनेक्शनच्या योजनेचे डिस्पले सुद्धा पेट्रोल पंपावर लावण्याच्या सुचना सरकारी तेल कंपन्यांकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप एस.एस. गोगी यांनी केला आहे.
त्यातही हद्द म्हणजे भारतातील पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांची खासगी माहिती सुद्धा सरकारने मागवली असून यामध्ये त्या कर्मचाऱ्यांची जात, धर्म तसेच ते कर्मचारी कुठल्या मतदार संघात येतात याबदद्ल विचारणा करण्यात आली आहे, असा गंभीर आरोपही गोगी यांनी केला आहे. त्यामुळे अशी माहिती मागून व्यक्तीगत अधिकारांचं उल्लंघन असून आम्ही या दबावाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचं सुद्धा गोगी यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण योजनेसाठी त्यांची ओळख पटवणं सोपं होईल असं कारण पुढे करण्यात आल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. देशातील तब्बल ५९,००० पेट्रोलियम डिलर्सला सरकारने असे पत्र धाडले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं