राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे: भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली : काँग्रेस सोबतच आता भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राफेल घोटाळ्यावरून नरेंद्र मोदींना लक्ष केलं असून राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा असल्याचा आरोप पंतप्रधानांवर केला आहे. तसेच मोदी सरकार विरोधी पक्ष तसेच जनतेचे या महत्वपूर्ण मुद्यावरुन लक्ष हटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. तसेच मोदी सरकारकडून मूळ प्रश्नांची उत्तरे टाळून दुसरेच मुद्दे समोर आणली जात आहेत असं थेट आरोप त्यांनी केला आहे.
राफेल कराराच्या वादामुळे पंतप्रधान मोदींच्या विश्वासाहर्तेला पूर्ण तडा गेल्याची जळजळीत टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली आहे. राफेल प्रकरणामुळे केंद्र सरकारच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून त्यामुळे मागील चार वर्षांपासून भ्रष्टाचार मुक्त राहिलेल्या मोदी सरकारला नजर लागल्यासारखे वाटत असल्याचेही शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट म्हटले आहे. विरोधकांच्या प्रश्नांना आणि टीकेला पारदर्शीपणे देणे उत्तर देण्याचे आवश्यक असले तरी मोदींकडून तसे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी मुलाखतीदरम्यान बोलताना व्यक्त केली.
तसेच केंद्र सरकार विरोधी पक्ष आणि सामान्य जनतेचे या महत्वपूर्ण मुद्यावरुन लक्ष हटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. याबाबत जी प्रश्चचिन्ह उपस्थिती केली गेली आहेत, त्याची उत्तरे देण्याचे टाळून दुसरेच मुद्दे समोर आणली जात आहेत. दरम्यान, राफेल घोटाळा हा बहुचर्चित बोफोर्स घोटाळ्याचा ‘ग्रँड फादर’ बनला आहे. त्यामुळे मोदींनी मौन सोडावे आणि जेपीसीची नियुक्ती केली जावी. त्यामुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाईल, असेही ते म्हणाले. राफेल व्यवहार का झाला, कसा झाला, कोणत्या परिस्थितीत झाला, कोणासाठी झाला आणि त्याचबरोबर याचे लाभार्थी कोण आहेत आणि का आहेत, या सर्व प्रश्नांची मोदींनी उत्तरे जनतेला दिली पाहिजेत असं ते म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं