राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल - शरद पवार

२४ फेब्रुवारी रोजी “महाहिट २४ मराठी” या नवीन वृत्तवाहिनीच्या उदघाटन समारंभाला राज ठाकरे उपस्थित होते. कोल्हापूर येथे झालेल्या या वाहिनीच्या उदघाटन समारंभात राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सध्याचं सरकार काय गैरप्रकार करत आहे याची उजळणी करून दिली. आणि या बातमीचा दाखला देत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले “राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीआधी असं काहीतरी घडेल” आणि आता तसंच काहीसं घडलं आहे म्हणून त्यांनी केलेलं भाकित गंभीरतेने घ्यायला हवं.
शरद पवार हे राजकारणातील जुने जाणते नेते असून त्यांनी केलेल्या या भाष्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप या सगळ्या गोष्टींचा राजकीय फायदा घेत असून, पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा मोदी आणि भाजप पक्षसंघटनेच्या बैठकांमध्ये व्यस्त होते. ते या हल्ल्याचा राजकीय फायदा घेत आहेत असे बऱ्याच जाणकारांचे मत आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
भाजप सरकार हे अपयशी सरकार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासाठी काहीच नसून केवळ लोकांमध्ये देशभक्तीची लहर निर्माण करायची आणि त्यातून लोक आपोआप मागचं सगळं विसरून जातील. आणि त्यासाठी हे कदाचित १ लहानसं युद्ध देखील घडवून आणतील असं भाकीत राज ठाकरेंनी २४ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात केलं होतं.
तसेच जर भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची चौकशी केली तर सगळं काही उघड होईल आणि भाजपचं पितळ देखील उघड होईल. पुलवामा हल्ल्यानंतर इतर सर्व पक्ष भारत सरकारच्या मागे पूर्ण ताकतीने उभे राहिले आणि आपण देशासाठी १ आहोत असे जाहीर केले. परंतु या सभेला मात्र मोदीच अनुपस्थित होते, त्यावेळी ते उदघाटन, समारंभ आणि पक्ष बांधणीच्या कामात व्यस्त होते.
पुढे राज ठाकरे असे म्हणतात पुलवामा हल्ल्यातील जवान हे राजकीय बळी ठरले. तसेच निवडणुकीपूर्वी अशीच कुठची तरी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे त्या गोष्टीकडे केंद्रित होईल. या सगळ्या गोष्टींमुळे लोक मागच्या साडेचार वर्षात झालेला भ्रष्टाचार विसरून जातील आणि इतर सगळे मुद्दे जसे कि विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी, राफेल घोटाळा हे बाजूला राहतील. हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान असे १ चित्र उभे करायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचे असं काहीसं पुढील काही दिवसात घडणार आहे हे भाकीत राज ठाकरेंनी केलं होतं.
सविस्तर व्हिडीओ:
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं