याच सामान्य महाराष्ट्र सैनिकांच्या ताकदीने राज ठाकरे आगामी निवडणुकीत सर्व गणित बदलतील: सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षविस्तारावर लक्ष केंद्रित केल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मागील काही काळात अनेक वरिष्ठ नेते मंडळी पक्षाची साथ सोडून गेल्याने पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी राज ठाकरे स्वतः नव्या जिद्दीने मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पक्षातील जुने सामान्य कार्यकर्ते तर आहेतच, परंतु इतर पक्षातील कार्यकर्ते आजही मोठ्या प्रमाणावर मनसेमध्ये जाहीर प्रवेश घेताना दिसत आहेत आणि त्यावरूनच राज ठाकरें बद्दल तरुणांमध्ये असलेलं प्रचंड आकर्षण अधोरेखित होत. राजकारणात पक्षाच्या कठीण काळात आणि कठीण वेळीच खरा कार्यकर्ता व त्या कार्यकर्त्याची नैतृत्वा प्रती असलेली आत्मीयता खऱ्या अर्थाने समोर येते.
तरुण आणि महिला कार्यकर्त्यांची तीच नेत्याप्रती असलेली आत्मीयता आणि समर्पण काल मुंबईत मालाड येथे आप्पापाडा या ठिकाणी ग्रंथालयाचे उदघाटन राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा पाहायला मिळाली. मुंबईत २ दिवस तुफान पाऊस सुरु आहे आणि त्यात हा पूर्वनियोजित कार्यक्रम आठवडाभर आधी आखण्यात आला होता. मुंबईतील तुफान पावसात सुद्धा कार्यकर्ते कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला लागले होते आणि सर्व तयारी पूर्ण झाल्यावर पावसाने २ दिवस जोरदार बॅटिंग केल्याने कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह आलं होत. मात्र प्रत्यक्ष दिवशी वेगळंच चित्र प्रसार माध्यमांना अनुभवण्यास मिळालं.
ग्रंथालयाच्या प्रत्यक्ष उदघाटनाची दिवशी सुद्धा तुफान पाऊस सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नियोजित ठिकाणी आले आणि उपस्थित कार्यकर्त्यांना सुद्धा संबोधीत केलं. परंतु त्यानंतर कार्यकर्त्यांचा जोश पाहण्यासारखा होता. राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधीत करण्यासाठी उभे राहताच कार्यकर्त्यांनी मोठं मोठ्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तुफान बरसणाऱ्या पावसात पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेत्याप्रती असलेली असलेली आत्मीयता पाहण्यासारखी होती, जी सध्याच्या राजकारणात क्वचितच निदर्शनास पडते.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांचा हा जोश असाच वृद्धिंगत होत राहिल्यास मनसे आगामी निवडणुकीत अनेकांची गणित बदलू शकत असं चित्र पाहावयास मिळत आहे. आज जरी प्रसार माध्यमांमध्ये मनसेच्या बाबतीत नकारात्मक बातम्या अधिक प्रमाणावर प्रसारित होत असल्या तरी, भाजप आणि शिवसेना सरकारच्या सत्ताकाळाचा अनुभव घेता मनसे प्रसार माध्यमांमध्ये पुन्हा ‘होकारात्मक मोड’ गेल्यास ते थेट सामान्यांच्या मनात प्रवेश करून आगामी निवडणुकीत नवे चमत्कार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं