‘बोला काय विचारू?’, ‘मोदीमय’ मुलाखतीची राज ठाकरेंकडून खिल्ली

मुंबई : पंतप्रधानांच्या त्या मुलाखतीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. मोदींची ती मुलाखत म्हणजे स्वतःच स्वतःला प्रश्न विचारल्यासारखं होतं, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानांना लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी हे स्वतःच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी “बोला काय विचारु ?” असं प्रश्न ते स्वतःलाच दुसऱ्या बाजूने करत आहेत असं दाखवलं आहे. त्या मुलाखतीचा एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला असून, ती ठरवून केलेली मुलाखत होती असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं आहे.
नुकतीच पंतप्रधानांनी एएनआय या वृत्तसंस्थेला प्रदीर्घ मुलाखत दिली होती आणि काही अनुत्तरित असलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली होती. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांना नरेंद्र मोदी यांनी तब्बल ९५ मिनिटांची मुलाखत दिली होती. दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी नोटाबंदी, गांधी घराणं, उर्जित पटेल यांचा राजीनामा, जीएसटी, काळा पैसा, भाजपाचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव अशा अनेक विषयांवर दीर्घकालाने मतं मांडली.
परंतु, या मुलाखतीचे प्रश्न आधीपासूनच ठरले होते अशी टीका विरोधक करत आहेत. तर त्याला अनेकांनी मॅच फिक्सिंग असा टोला लगावला होता. त्याच भावना राज ठाकरे यांनी सुद्धा व्यंगचित्रातून व्यक्त केल्या आहेत आणि मोदींची खिल्ली उडवली आहे.
नेमकं काय व्यंगचित्र रेखाटलं आहे राज ठाकरे यांनी?
#Modi2019Interview #PMtoANI #RajThackeray #PoliticalCartoon pic.twitter.com/07s5mcekvJ
— Raj Thackeray (@RajThackeray) January 3, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं