मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले ? : राज ठाकरे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील जैन समाजातील मंडळींची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित जैन समाजातील लोकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले, मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना, असा प्रश्न उपस्थित जैन समाजातील लोकांपुढे करून मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
तसेच धर्म आणि जात या विषयावर भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे सांगितलं की, ‘मी कोणत्याही धर्म, जातीच्या विरोधात नाही, मला प्रत्येक जात आवडते’, देशात जातीय तेढ वाढली असून मी लहान असताना माझे वर्गमित्र विविध जातीतील होते. पण त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या जातीचा कधीही विचार आला नव्हता. मला सर्व जाती आवडतात, कारण प्रत्येक जातीतील जेवण चांगल असते, अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी मांडली. तसेच जैन मुनींनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार का करावा? तुम्ही मुनी आहात मग पक्षाचा प्रचार का करता? याचा जाब जैन समाजानेच विचारला पाहिजे.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत ‘केम छो’ असे म्हणत केले होते. तुम्हाला ते आवडलेही असेल, पण मला ते आवडले नाही. भारताच्या पंतप्रधानांवर कोणत्याही राज्याचा शिक्का नसावा. त्यांच्यावर देशाचाच शिक्का असायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मनमोहन सिंग यांचे स्वागत कधी पंजाबी भाषेत केले आहे का?, अमेरिकेचे लोक हुशार आहेत. एखाद्या व्यक्तीसमोर काय बोलावे म्हणजे तो खूश होईल हे त्यांना माहित आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. उपस्थितांसमोर राज ठाकरे यांनी कोणतही जातीपातीच राजकारण न करता रोख ठोक भूमिका मांडत आणि देशातील सत्य परिस्थितीवर बोट ठेऊन जैन समाजाची काणघडणी केल्याचे दिसत होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं