सीबीआय प्रकरण; राज ठाकरेंचं मोदींच्या 'वर्मा'वर बोट: व्यंगचित्र प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या देशभर खळबळ माजविणाऱ्या सीबीआय मधील घडामोडींवरून मोदींच्या “वर्मावर” नेमकं बोट ठेवलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. आज राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरून प्रसिद्ध करण्यात आलेलं हे व्यंगचित्र मोदी सरकारच्या सुद्धा “वर्मावर” लागण्याची चिन्ह आहेत.
सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेल्याने केंद्रसरकारने सीबीआय संचालक अलोक वर्मा यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने विद्यमान प्रभारी एम. नागेश्वर यांच्यावर सुद्धा काही निर्बंध घालून सादर प्रकरणाची चौकशी १० दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जारी केले आहेत. परंतु, सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्याकडे राफेल प्रकरणाची चौकशी फाईल असल्याने मोदी सरकारने ही तडकाफडकी कारवाई केल्याचे बोललं जात आहे.
नेमका या सर्व घडामोडींचा आधार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या “वर्मावर” घाव करणार व्यंगचित्र प्रसिद्ध केला आहे. समाज माध्यमांवर हे व्यंगचित्र प्रचंड शेअर होत असून त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
काय आहे ते मोदींच्या “वर्मावर” बोट ठेवणारं नेमकं व्यंगचित्र;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं