आजपासून भाजपसाठी 'पप्पू'चा परमपूज्य झाला' : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा निकाल आणि भाजपच्या पीछेहाट होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ५ राज्यांमधील निकालांवर मत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या जुलमी राजवटीला ही मतदाराने दिलेली चपराक आहे, अशा तिखट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे सविस्तर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘पहिल्यांदा मोदींच्या होमग्राऊंडमध्ये त्यांना जागा दाखवणारे गुजरात हे पहिले राज्य होतं. त्या निवडणुकीदरम्यान झालेले मतदान आणि आता झालेल्या मतदानावरून भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा समजली आहे. त्यावेळी गुजरातमध्ये १६५ जागा येणे गरजेचं होतं पण प्रत्यक्षात तिथे ९९ जागा आल्या होत्या. उर्जित पटेल यांनी भविष्यातील कुठल्या तरी मोठ्या संकाटाआधी राजीनामा दिला, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू-पप्पू म्हणून हिणवणाऱ्या भाजपाला सध्या राहुल गांधी ‘परम-पूज्य’ झाले आहेत असं सुद्धा खोचकपणे सांगून राज ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं