राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती - नितीन गडकरी

आज ए.बी.पी. माझाला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत बोलताना नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंबद्दल १ खंत व्यक्त केली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मी ज्यांच्याशि मैत्री करतो त्यांचा हात कधीच सोडत नाही, राज ठाकरेंचे विचार अगदी सुस्पष्ट होते. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळपास समान आहे, परंतु काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी आहे. राज आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये ताळमेळ नाही आणि युती हि नेहमी विचारांच्या आधारावर करावी तसेच राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती, असं नितीन गडकरी म्हणाले. निवडणुकीत राज ठाकरे काय बोलतील हे त्यांचं त्यांनी ठरवावं, परंतु आमची आणि शिवसेनेची युती हि हिंदुत्वावर आधारित आहे.
गरिबांचा विकास करताना मी कधीच राजकारण करत नाही आणि करणारहि नाही. जे जगात नाही ते मी नागपुरात करण्याचा प्रयत्न करत आहे, नागपूरच्या जनतेने सेवेची संधी दिली म्हणून हे शक्य झालं. विचारांची लढाई असली पाहिजे, राहुल गांधींनी टीका करताना पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे असा सल्लाही गडकरींनी राहुल गांधींना दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं