राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; खोट्या विहिरींची राज ठाकरेंकडून पोलखोल

मुंबई : सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे आणि ग्रामीण भागावर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि १ लाख २५ हजार विहिरी बांधल्याचा दावा सुद्धा त्यामुळे फसवा ठरल्याने राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना लक्ष केले आहे.
दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेला दावा तसेच उपाययोजना फोल ठरल्याचं समोर येत आहे. जलयुक्त ‘शिव्या’र या नावाने प्रसिद्ध केलेल्या आजच्या व्यंगचित्रात सरकारच्या या कुचकामी आणि फोल ठरलेल्या धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्र तहानला आहे, असा टोला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्राद्वारे लगावला आहे
विशेषम्हणजे मराठवाडय़ातील पाणीसाठा जेमतेम २७.७९ टक्के इतकाच शिल्लक असून नाशिक विभागातील पाणीसाठा ६४.९५ टक्के इतका आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने दडी मारल्याने तेथील शेती मोठ्या प्रमाणावर संकटात सापडली आहे. दरम्यान, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या १ लाख २५ हजार विहिरी बांधल्याचा दाव्याची राज ठाकरे यांनी पोलखोल केली आहे असच म्हणावं लागेल.
काय आहे ते नेमकं व्यंगचित्र?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं