राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र उध्दव ठाकरेंवर ; सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद

मुंबई : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेची नेते मंडळी बऱ्याचदा सत्तेतून बाहेर पाडण्याचे इशारे देत असतात. शिवसेनेचे हे राजीनामा देऊ आणि सरकारमधून बाहेर बाहेर पाडण्याचे वारंवार दिले जाणारे इशारे म्हणजे सामान्य माणसासाठी केवळ एक विनोद झाला आहे. नेमकं तेच हेरत आज राज ठाकरेंनी एक नवीन व्यंगचित्र प्रसिध्द केलं ज्यात त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केलं आहे.
राज ठाकरेंच्या अधिकृत फेसबुक पेज वरून ते प्रसिध्द करण्यात आलं. विशेष म्हणजे थेट उध्दव ठाकरेंनाच लक्ष्य केलेल्या या नवीन व्यंगचित्राला समाज माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व सामान्य लोकांमधूनही या व्यंगचित्राला खूप प्रतिसाद मिळत आहे.
आता पर्यंत राज ठाकरेंनी फेसबुक वर प्रसिध्द केलेली सर्व व्यंगचित्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंव्हा भाजप संबंधित होती. परंतु आज प्रसिध्द झालेलं व्यंगचित्र हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मार्मिक पणे लक्ष करणार होतं.
सौजन्य – राज ठाकरे यांचं फेसबुक पेज;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं