व्हिडिओ: राज यांचा गुढीपाडव्याच्या सभेतील अक्षय कुमारवरील तो आरोप त्याच्याच तोंडून?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला शिवतीर्थावर जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर बोट ठेवलं होतं. त्याचं मूळ कारण होत ते भाजपसोबत त्याचा २०११ पासून जो शिस्तबद्ध खेळ सुरु होता तो त्यांच्या राजकारणाच्या अनुभवातून ध्यानात आला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांना लक्ष करण्यात आलं होतं. त्यात भाजप समर्थकांचा मोठा वाटा होता.
राज ठाकरे त्यावेळी सभेतील भाषणादरम्यान म्हणाले होते की, ‘अक्षय कुमार हा मुळात स्वतः कॅनेडियन नागरिक आहे आणि तो आता भारताचे गुणगान गात आहे. परंतु त्याच भाषणात राज ठाकरें अजून एक वाक्य बोलून गेले होते आणि ते होत ‘तुमचं (म्हणजे भाजपचं) काय चालू आहे ते न कळण्याइतका मी काही दुधखुळा नाही. नेमकं याच सभेच्या २ दिवसानंतर अक्षय कुमारला भाजप थेट राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्याच्या तयारीत होती. राज यांनी ते हेरलं आणि २ दिवस आधी अचूक बाण मारला आणि भाजपचा तसेच अक्षय कुमारचा २०११ पासूनच राजकीय खेळ संपला होता.
भाजप त्याला भारतीय लष्करा आड प्रमोट करत सामान्य लोकांशी भावनिकपणे जोडण्याची योजना आखात होती. विशेष म्हणजे एखाद्याला स्वेच्छेने भारतीय जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करायची असेल तर २०१२ पासूनच पीएमओ अंतर्गत केंद्र सरकारची ‘नॅशनल डिफेन्स फंड’ ndf.gov.in ही तरतूद असताना पुन्हा ‘भारत के वीर’ BharatKeVeer.in मागील नक्की कारण काय होत ? अक्षय कुमार करू इच्छित असलेली मदत ‘नॅशनल डिफेन्स फंड’ मार्फत करू शकला असता. परंतु, भाजपने ‘भारत के वीर’ BharatKeVeer.in ही वेगळी वेबसाईट बनवली आणि अक्षय कुमार स्वतःच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून या वेबसाइटचं मार्केटिंग करत होता. वास्तविक सरकारची कोणतीही अधिकृत वेबसाइट ही “जि.ओ.व्ही डॉट इन अर्थात gov.in” अशी असते मग भारतीय लष्कराशी संबंधित वेबसाईट केवळ “डॉट इन” कशी जी अक्षय कुमार प्रमोट करत होता, हा प्रश्न येतो. केंद्र सरकार सुद्धा ‘नॅशनल डिफेन्स फंड’ ndf.gov.in ही वेबसाईट दुर्लक्षित करून केवळ ‘भारत के वीर’ BharatKeVeer.in ही वेबसाईट प्रमोट करत होते. कारण एकच होतं ते म्हणजे अक्षय कुमारला भावनिक दृष्ट्या लष्कराशी जोडायचं आणि सामान्य लोंकांशी त्याला भावनिक दृष्टीकोनातून जोडून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा.
परंतु, राज ठाकरे यांनी भाजपचा तो डाव ओळखला होता आणि गुडीपाडव्याच्या सभेत अचूक बाण मारत त्याच्या खऱ्या नागरिकत्वाचा खुलासा केला होता. त्याला त्याच्या कॅनडियन नागरिकत्वाचा आर्थिक व्यावसायिक फायदा सुद्धा होतो आणि अक्षय जन्माने मूळचा पंजाबी असून, पंजाबी भाषा ही कॅनडा सरकारची इंग्लिश आणि फ्रेंच भाषेनंतर तिसऱ्या क्रमांकाची संसदीय भाषा आहे. तसेच कॅनडामधील सर्वाधिक बोलली जाणारी ती तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे तो भारतापेक्षा कॅनडावर अधिक प्रेम करतो. भारतीय निवडणूक नियमानुसार, उमेदवार हा भारताचा अधिकृत नागरिक असणे गरजेचे आहे. परंतु, अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक असून सुद्धा भाजप त्याला लष्कारामार्फत प्रमोट करून भाजपचा खासदार बनवण्याची तयारी करत होतं. नेमका इथेच राज ठाकरे यांनी भाजप आणि अक्षय कुमारला कात्रीत पकडलं आणि संपूर्ण भावनिक खेळ संपवला होता. परंतु, राज ठाकरे यांचा तोच दावा अक्षय कुमारच्या तोंडूनच खरा असल्याचे समोर येते आहे. सदर व्हिडिओ २००८ मधील असला तरी त्यामध्ये त्याने जे सांगितलं आहे ते राज ठाकरेंच्या दाव्याला दुजोरा देणारं आहे असंच म्हणावं लागेल. हा व्हिडिओ २००८ मध्ये कॅनडातील एका कार्यक्रमातील आहे.
या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार उपस्थित कॅनेडियन नागरिकांना सांगत आहे की, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कि, टोरोंटो (कॅनडाची राजधानी) हे माझं घर आहे. मी जेव्हा बॉलिवूडमधून निवृत्त होईन तेव्हा मी भारतातून टोरंटोमध्ये स्थलांतरित होईन”.
पहा तो अक्षय कुमारचा व्हिडिओ;
राज ठाकरेंचा आरोप खरा ठरला! “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कि, टोरोंटो (कॅनडाची राजधानी) हे माझं घर आहे. मी जेव्हा बॉलिवूडमधून निवृत्त होईन तेव्हा मी माझ्या संपत्तीसकट भारतातून टोरंटोमध्ये स्थलांतरित होईन”. pic.twitter.com/PN3hED8FYg
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) December 26, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं