'महाराष्ट्र दिनी' राज ठाकरेंची तोफ 'पालघर' मध्ये धडाडणार

पालघर : महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालघर जिल्ह्यात जाहीर सभा होत असून पालघर, वसई आणि विरारकरांना नको असलेला बुलेट ट्रेन विरोधात राज ठाकरे हे राज्य तसेच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून मनसेचा कडवा विरोध सिद्ध करतील.
मुंबईतून पालघर, वसई, नालासोपारा आणि विरार येथे मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस स्थलांतरित झाला असून येथील रोज प्रवास करणाऱ्या जनतेला अनेक समस्यांनी आधीच घेरलेले आहे. त्यात पुन्हां बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प जे महाराष्ट्राला आणि स्थानिकांना काहीच कामाचे नसल्याचा मत प्रवाह तिथल्या मराठी लोकांचा आहे. लोकल ट्रेनच जाळ भक्कम करण्याऐवजी सरकार विनाकारण बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प स्थानिक जनतेवर लादत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे.
पालघर, वसई, नालासोपारा आणि विरार मध्ये अनेक वर्षांपासून वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत समस्यासुद्धा जैसे थे आहेत. येथून निवडून आलेले आमदार आणि खासदार आर्थिक दृष्ट्या रग्गड झाले असून, जनता मात्र अनेक वर्ष हवालदिल झाली आहे. पालघर, वसई, नालासोपारा आणि विरारमधील जनतेला बदल हवा असेल तर आधी तिथली जुनी राजकीय परिस्थिती बदलने गरजेचे आहे. अविनाश जाधव यांच्यासारखा युवा नेता आक्रमक पणे स्थानिकांचे विषय उचलत असून, त्यांनी येथील अनेक अनधिकृत बांधकामांसारख्या विषयांना हात घालत, जनतेच्या मनात खदखदणाऱ्या विषयांना वाट करून दिली असून कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण केला आहे.
स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी पालघर, वसई, नालासोपारा आणि विरार मधील लोकांच्या मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला येथील प्रत्येक रेल्वे स्थानकात महिलांनी मोठा पाठिंबा दिला होता. एकूणच राज ठाकरेंसारख्या आक्रमक नेत्याबद्दल स्थानिक मराठी जनतेचा अधिक अपेक्षा असून कार्यकर्त्यांनी जर मेहनत घेतल्यास २०१९ मध्ये येथील राजकीय समीकरणं बदलू शकतात.
सध्या पालघर जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीच्या वारे वाहत असून मनसे मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करणार असून विरोधकांना थेट इशारा दिला जाणार आहे. राज ठाकरेंची सभा होणार असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांचा जोश सुद्धा द्विगुणित झाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं