राजस्थान: भाजपला धक्का, खासदार हरीशचंद्र मीणा आणि आमदार हबीबुर रहमान काँग्रेसमध्ये

राजस्थान : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी सरकारला जोरदार राजकीय झटका देत भारतीय जनता पक्षाचे खासदार हरीशचंद्र मीणा आणि आमदार हबीबुर रहमान यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यादी महाराष्ट्रातून भाजप सोडून काँग्रेसमध्ये विदर्भातील खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हरीशचंद्र मीणा हे काँग्रेस प्रवेश करणारे दुसरे खासदार ठरले आहेत. त्यामुळे सध्या लोकसभेत भाजपचे संख्याबळ अधिकृतपणे २७२च्या जादुई आकड्यावरून खाली घसरले आहे.
खासदार हरीश मीणा हे राजस्थानच्या दौसा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. काल त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत भाजपाला आई मोदी सरकारला धक्का दिला आहे. दरम्यान, अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना हरीश मीणा हे राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक होते.
२०१४च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर त्यांनी आपलेच ज्येष्ठ बंधू आणि काँग्रेसचे उमेदवार नमो नारायण मीणा यांचा दारुण पराभव केला होता. तसेच कालच खासदार हरीश मीणा यांच्या काँग्रेस प्रवेशासोबतच काँग्रेसने राजस्थानात अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या विधानसभा उमेदवारीची सुद्धा अधिकृत घोषणा केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं