रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस मोदी सरकारकडे केली असून ते ३ ऑक्टोबर रोजी नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
ज्येष्ठतेच्या निकषावर न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. त्यामुळे रंजन गोगोई यांचे नाव सर्वात आघाडीवर असून त्यांच्याच नावाची विद्यमान सरन्यायाधीशांनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. कायदा मंत्रालयाने तशा प्रकारचा पत्र व्यवहार देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशी करून त्यांना नव्या सरन्यायाधीशांसाठी शिफारस करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार रंजन गोगोई यांची ज्येष्ठतेच्या निकषावर निवड होण्याची शक्यता असल्याचे समजते.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ न्यायधीशांनी जे बंड केले होते, त्यात रंजन गोगोई यांचा सुद्धा समावेश होता. त्यावेळी भर पत्रकार परिषदेत ५ न्यायाधीशांनी न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं