ती जागा राम जन्मभूमीच, आता सरकारने कायदा बनवावा : मोहन भागवत

नागपूर : अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिरच होते. आणि ती भूमी रामल्लाचीच आहे. कारण तिथे केलेल्या उत्खननात सुद्धा राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तसेच कोर्टाच्या प्रक्रियेला फार विलंब होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने तसा कायदा करावा, अशी थेट मागणी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हुंकार सभेत केली. तसेच आता राम मंदिराच्या कायद्यासाठी देशभरात जनजागृती करण्याचे थेट आवाहान सुद्धा आरएसएस प्रमुखांनी यांनी केले.
विहिंप’ने आयोजित केलेल्या हुंकार सभेला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधित केले, त्यावेळी भाष्य करताना ते म्हणाले की, ‘हा देश रामाचा आहे. बाबर हा आपल्या देशाचा नव्हता, तर प्रभू राम आपला आहे. त्यांचे भव्य मंदिर त्या ठिकाणी बनणार नाही मग कसे होणार. देशातील हिंदू समाज प्रत्येकाचा नितांत आदर करतो. म्हणूनच या निर्माणासाठी तीस वर्ष लागत आहेत. राम जन्मभूमीबाबत कोर्टाची प्राथमिकता आहे,असे आम्हाला वाटत नाही. परंतु, सर्वाना वाटते राम मंदिराचे निर्माण लवकरात लवकर सुरु व्हावे. पण इथे कोर्टात साधी सुनांवणी सुद्धा सुरु होत नाही. आणि जनहितासाठी हा मुद्दा टाळत राहणे देशासाठी योग्य नाही, असं ते म्हणाले.
पुढे आरएसएस प्रमुख म्हणाले की, “अयोध्येतील त्या विवादित जागेवर केलेल्या खोदकामा दरम्यान राम मंदिर असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे याविषयी लवकरात लवकर ठोस निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच न्यायव्यवस्थेतील विलंबास टाळणे गरजेचे आहे. २०१० साली कोर्टाने न मागता जागेची वाटणी सुद्धा केली.” असा थेट आरोप सुद्धा आरएसएस प्रमुखांनी न्यायव्यवस्थेवर केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं