विरोधी पक्षनेते पद: शिवराज सिंह चौहान यांना आरएसएस'चा विरोध

भोपाळ : मध्यप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. के कमलनाथ लवकरच मुख्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारतील. सत्ताधाऱ्यांचा विषय मार्गी लागला असला तरी विरोधकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे. कारण सभागृहाच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नाव पुढे रेटले जात असताना संघाकडून मात्र शिवराजसिंग यांच्या नावाला तीव्र विरोध असल्याचे समजते.
मागील १५ वर्षं शिवराजसिंह चौहान मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होते. परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवराजसिंहांच्या समर्थकांचा एक गट भारतीय जनता पक्षात तर विरोधकांचा एक गट थेट संघामध्ये निर्माण झाला होता. परिणामी या दोन गटांमधील कंपूशाहीचा परिणाम भाजपच्या प्रचार यंत्रणेवर झाला. परिणामी राज्यात भाजपचा पराभव झाला.
मात्र आता विरोधीपक्षनेतेपदी एखाद्या ब्राम्हण नेत्याची वर्णी यावी अशी मागणी थेट संघाकडून पुढे येऊ लागली आहे. कारण ब्राम्हण नेत्याची नियुक्ती केल्यास राज्यातील सवर्णांमधील नाराजी दूर करता येईल असं आरएसएस’च म्हणणं आहे. असं असलं तरी भाजपमधील गटाला मात्र शिवराजसिंहांचे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील दिल्लीश्वरांपुढे भलताच पेच निर्माण झाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं