संघ दक्ष! भाजप मध्य प्रदेशात तब्बल ७८ आमदारांना तिकीट नाकारणार? संघाचा सल्ला

भोपाळ : मध्य प्रदेशातील भाजप विद्यमान ७८ आमदारांना तिकीट नाकारण्याची शक्यता आहे. आरएसएस’ने केलेल्या एका सर्वेक्षणात त्या ७८ आमदारांवर मतदार प्रचंड नाराज असल्याचं समोर आल्याने आधीच धोका स्वीकार करा आणि त्यांना पुन्हा तिकीट देऊ नका, अशी सूचना आरएसएस’ने भाजपला केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश भाजपमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक केवळ दीड महिन्यावर आल्याने आणि त्यात संघाच्या या सल्ल्यामुळे भाजप अजूनच अडचणीत आली आहे.
आरएसएस विधानसभा असलेल्या राज्यातील गुप्त आढावा घेत आहे आणि मध्य प्रदेशात ती काळजी घ्यावी अन्यथा निवडणुकीच्या निकालात परिणाम भोगावे लागतील असे निर्देश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील सध्याच्या तब्बल ७८ आमदारांची कामगिरी अत्यंत सुमार झाली असून त्या आमदारांबद्दल मतदारांच्या मनात खूप रोष आहे, असं संघाचा तो अहवाल सांगतो. परंतु स्थानिक भाजपने संघाच्या या सूचनेवर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेले नाही. आमच्या पक्षाची निवड समिती याबाबत योग्य निर्णय घेईल, असं राज्य भाजपचं म्हणणं आहे.
भाजपने उमेदवारांची निवड प्रक्रिया करताना ज्या उमेदवाराची विजयाची सर्वात जास्त शक्यता आहे त्यालाच संधी दिली जाईल, अशी स्थानिक भाजपची भूमिका आहे. परंतु, ज्या नेत्यांवर राजवटीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत, परंतु ते सिद्ध झालेले नाहीत अशा नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी मत व्यक्त केलं आहे. विनय सहस्त्रबुद्धे हे मध्य प्रदेश उमेदवारांची निवड करणाऱ्या समितीचे प्रमुख आहेत. डिसेंबर मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं