रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २ दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम खरेदी कराराच्या दृष्टीने पुतिन यांचा हा भारत दौरा महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणार असून या खरेदी कराराला गुरुवारी भारतीय अधिकारी आणि रशियन अधिकारी स्वाक्षऱ्या करून अंतिम स्वरूप देतील असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून पसरवला जात असलेला दहशतवाद सुद्धा या चर्चेत असणार आहे. भारत आणि रशियामध्ये अवकाश सहकार्य करारही होण्याची शक्यता आहे. भारताने रशियाबरोबर एस-४०० क्षेपणास्त्राचा खरेदी करार केल्यास अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध घातले जाण्याचीही शक्यता आहे. तसे संकेत सुद्धा अमेरिकन सरकारकडून देण्यात आले होते.
अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक देशांवर, संस्था तसेच व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने याआधी चीनवर निर्बंध घातले आहेत. कारण चीनने रशियाकडून एसयू-३५ फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे. चीन बरोबरच अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत इराण, रशिया आणि उत्तर कोरिया या ३ देशांवर सुद्धा याआधी निर्बंध घातले आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या टू-प्लस-टू बैठकीत एस-४०० च्या खरेदी व्यवहाराला अधिकृत परवानगी देण्यात यावी यासाठी भारताकडून अमेरिकेबाबत चर्चा करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अजून पर्यंत कोणते सुद्धा ठोस आश्वासन दिलेले नाही आणि त्याने सर्व अधांतरीच होत. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे भविष्यातील हवाई हल्ले विफल करता येऊ शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं