तर मी राम मंदिरही बांधायला जाईन, साध्वी प्रज्ञा सिंह.

औरंगाबाद : जशी बाबरी पडायला गेली होती तशी मी राम मंदिरही बांधायला जाईन असे धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ने केले आहे. त्या औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक राष्ट्रभक्त असून ते इतरांपेक्षा वेगळं आणि चांगले काम करत आहेत. राम मंदिर ही सर्व जनमानसाची भावना आहे असं ही साध्वी प्रज्ञा सिंह पत्रकारांना संबोधित करताना म्हणाल्या.
साध्वी प्रज्ञा सिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी होत्या आणि त्यांना काही वर्ष शिक्षाही झाली होती. कालांतराने त्यांची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. १९९२ रोजी बाबरी मशिद पडल्यावर देशभरात मोठ्या जातीय दंगली उसळल्या होत्या. बाबरी मशिद आणि रामजन्मभूमी हा वाद जवळजवळ १२० वर्ष जुना असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर लवकरच निकाल लागेल अशी शक्यता आहे. त्याला अनुसरूनच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हे असे विधान केले की, लवकरच राम मंदिर उभं राहील आणि ते बांधायला आपण जाऊ असा आशावाद साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं