बाळासाहेब ठाकरे मर्द होते तर उद्धव ठाकरे घुटने टेकू: अबू आझमी

मुंबई : स्वबळाची शपथ घेणारे आणि मागील साडेचार वर्ष सत्तेत राहून भाजप आणि मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वच विरोधकांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसीम आझमी यांनी आता उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. अबू आसीम आझमी म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे मर्द होते तर उद्धव ठाकरे घुटने टेकू आहेत’ अशी बोचरी टीका केली आहे. भाजपवर टीका करून आणि भाजपच्या अल्टिमेटमला घाबरून उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली असं अबू आझमी म्हणाले.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर सर्वच विरोधक उद्धव ठाकरेंच्या या धरसोड वृत्तीवर टीका करतील. तसेच स्वबळाची शपथ स्वतःच मोडल्याने पक्षांतर्गत अनेक कुरबुरी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात मोठी कोंडी झाली आहे ती शिवसेना कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची जे स्वबळाची घोषणेमुळे निवडणुकीच्या तयारीला लागले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं