'ते' अटक करण्यात आलेले आमचे साधक नाहीत, सनातन संस्थेने हात वर केले

मुंबई : मागील काही दिवसांपासून नालासोपारा येथून करण्यात आलेल्या धरपकडी नंतर राज्यभर अनेक ठिकाणी एटीएस’कडून अटक सत्र सुरु झालं होतं. त्यातील अटक करण्यात आलेले सर्वजण हे सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणात सनातन संस्थेने हात झटकल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मराठा आंदोलन व ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा कट होता, असे सर्व आरोपही सनातनने फेटाळून लावले आहेत. काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथे आढळलेली स्फोटके आणि त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हात असलेल्या आरोपींना एकामागे एक अटक झाल्यानंतर त्या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यानंतर सर्वच थरातून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुढे येत होती. त्या पार्श्वभूमीवर आज सनातन संस्थेने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
पत्रकार परिषदेत बोलताना सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितलं कि, वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींचा सनातनशी संबंध नाही तसेच ते सनातनचे साधक सुद्धा नव्हते, तपासात सनातनचे थेटपणे नाव आलेले नाही. मराठा आंदोलन तसेच ईददरम्यान स्फोट घडवण्याचा सनातनचा हेतू होता त्यामुळे हा आरोप धादांत खोटा आहे असे राजहंस यांनी म्हणाले. तसेच सनातनबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या येत असून, अशा बातम्या प्रसारित करणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सनातनकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच सनातन संस्थेने या संपूर्ण प्रकरणातून अंग काढून घेतल्याचे बोललं जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं