गुजरातींना धमकी? गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे, मोदींनाही वाराणसीला जायचे आहे

नागपूर : चिमुकलीवर गुजरातमध्ये झालेल्या बलात्कारानंतर सध्या उत्तर भारतीयांना गुजरातमधून मारहाण करून हुसकावून लावण्यात येत आहे. अगदी गुजरात मध्ये पोलिसांना फ्लॅगमार्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या संजय निरुपम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसेच गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकावत आहेत अशी चर्चा राजकीय निरुपम यांच्या नागपूरमधील वक्तव्यावरून रंगली आहे.
संपूर्ण राजकीय कारकिर्दीत स्वतः उत्तर भारतीयांसाठी काहीच भरीव न करू शकणारे संजय निरुपम उत्तर भारतीयांच्या जोरावर स्वतःची पोळी भाजण्याची एकही संधी सोडत नाहीत. गुजरातमधील वातावरण सध्या उत्तर भारतीयांसाठी खूप तापलं असून अनेकांनी गुजरातमधून मिळेल त्या गाडीने पलायन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा बलात्काऱ्यांविरुद्ध काही बोलण्याऐवजी संजय निरुपम यांनी थेट मोदी तसेच गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे.
गुजरातमध्येही उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत, त्याला अनुसरून संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निरुपम त्या संदर्भात बोलताना म्हणाले की, “आज पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे. पण एक दिवस मोदींना सुद्धा वाराणसीला जायचे आहे, असंही निरूपम पुढे म्हणाले. त्यामुळे निरुपमांच्या या भूमिकेकडे भाजप राजकीय स्वार्थासाठी आणि उत्तर भारतीय समाजाच्या मतांसाठी दुर्लक्ष करेल असं राजकीय जाणकारांना वाटतं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं