अभ्यासपूर्वक राफेल प्रकरणाचे सत्य लोकांसमोर आणणार: अण्णा हजारे

अहमदनगर : मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आधीच विरोधकांनी केला आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याविषयावरून भाजपला काय करू आणि काय नको अशी परिस्थिती करून ठेवली आहे. परंत्तू, आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सुद्धा सदर विषयात हात घालणार असल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अण्णा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राफेल प्रकरणाचा मी अभ्यास करत असून, याबाबतचे सत्य मी सामान्य जनतेसमोर आणेण अशी घोषणा, अण्णा हजारे यांनी यांनी केली आहे.
दरम्यान, लोकपाल कायद्यासह इतर अनेक मागण्यांसाठी अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारीपासून जण आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर अण्णांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता राफेल विषयावर भाष्य केले. तसेच मी याविषयावर काही सुद्धा हवेत बोलणार नाही आणि जे बोलेन ते अभ्यासपूर्ण बोलेन असं अण्णा प्रतिक्रिया देताना म्हणाले.
आधीच राफेलच्या विषयावरून संकटात सापडलेल्या मोदी सरकारच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कारण स्वतः अण्णा हजारे सुद्धा याप्रकरणात लक्ष घालणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं