ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणवर, मोदी सरकारची डोकेदुखी वाढली

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणच्या मार्गाने एल्गार पुकारला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, तत्पूर्वीच गिरीश महाजन राळेगणसिद्धीला येऊन काहीच फरक पडणार नसून अण्णा तरीदेखील उपोषणाला बसणारच आहेत असे सांगून त्यांना भेटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा म्हणाले की, ‘गिरीश महाजन यांच्या हातात काहीच नाही. या आंदोलनाच्या संबंधित तोडगा काढण्यासारखे जे सर्व काही आहे ते दिल्ली सरकारच्या हातामध्ये आहे. अण्णा हजारे यांनी आज सकाळी दहा वाजता यादवबाबांचे दर्शन घेऊन जण आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान राज्यातील तमाम कार्यकर्त्यांनी ठरल्यानुसार आपापल्या नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी अण्णांनी केले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं