सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत

सांगली : सांगलीमध्ये राष्ट्रवादीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमदार गाडगीळ आणि आमदार खाडे यांना धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. कारण भाजपाचे जेष्ठ नगरसेवक धनपाल तात्या खोत आणि पत्नी सौ.सुलोचना खोत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
धनपाल तात्या खोत हे भाजपचे सांगलीतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांच्या पत्नी सुद्धा विद्यमान नगरसेवक आहेत. आतापर्यंत कुपवाड शहरावर त्यांचं मोठ वर्चस्व आहे. धनपाल तात्या खोत हे १९७८ पासून कुपवाड नगरपालिका व त्यांनतर १९९८ साली सांगली शहर महापालिका झाल्यापासून ते तिकडून सातत्याने निवडून येत आहेत. त्याआधी ते कुपवाडचे नगराध्यक्ष होते, सांगली महापालिकेचे ते स्थायी समितीचे सभापती सुद्धा होते. महत्वाचं म्हणजे कुपवाडमध्ये खोत यांचा प्रभाव असून त्याठिकाणी मोठा फटका भाजपला बसणार असल्याचं स्थानिक राजकीय विशेलषक बोलत आहेत.
एकूणच भाजपमधून सुद्धा निवडणुकीपूर्वी आउटगोइंग सुरु झालं आहे असं म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं