हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच | भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली - पवारांचा चिमटा

मुंबई, ०७ सप्टेंबर | भारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. आपण सर्व हिंदूच आहोत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. भागवत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना चिमटा काढला आहे. मोहन भागवत यांच्या विधानाने माझ्या ज्ञानामध्ये भर पडली आहे असा टोला पवारांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली – Sharad Pawar criticized Mohan Bhagwat statement over comment on Hindu Muslim :
मोहन भागवतांच्या वक्तव्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘भागवत सर्व धर्म एकच समजतात. चांगली गोष्ट आहे. दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झाला ही नवीन गोष्ट त्यांनी सांगितली आहे. यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली.’ असा टोला शरद पवारांनी लगावला.
काय म्हणाले होते मोहन भागवत?
ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम-राष्ट्र सर्वोपरि’ या विषयावरील सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी मोहन भागवत सोमवारी मुंबईत आले होते, जिथे त्यांनी मुस्लिम विद्वानांची भेट घेतली. भागवत म्हणाले की, भारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. भारतात मुस्लिमांनी घाबरण्याची गरज नाही. हिंदू हा शब्द आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध वारसा समान आहे आणि प्रत्येक भारतीय हिंदू आहे. त्यामुळे समंजस मुस्लिम नेत्यांनी कट्टरवाद्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Sharad Pawar criticized Mohan Bhagwat statement over comment on Hindu Muslim.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं