आगामी निवडणूक; मागे लागलेल्या रोडरोमियोत शिवसेनेला इंटरेस्ट असल्याचे वृत्त?

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूकपूर्व सर्व्हेचा धसका घेतल्याचं समजतं. त्यामुळे स्वबळ वगरे बाजूला ठेवून शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र जवळपास ठरल्याचे वृत्त प्रसार माध्यमांकडे आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून जागावाटपावरून येणाऱ्या प्रस्तावावरून प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, ‘रोडरोमियोसारखे आमच्या मागे का लागता? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही’, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला फटकारलं होतं. परंतु, सध्याच्या वृत्तानुसार त्याच रोडरोमियोने खुश करणारा प्रस्ताव समोर ठेवल्याने शिवसेनेचा इंटरेस्ट वाढल्याचे वृत्त आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष २५, तर शिवसेना २३ जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा १४५, तर शिवसेना १४३ जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं मिशन १५१ची घोषणा केल्यानं दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले. त्यावरुन युती तुटली होती. परंतु, आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाची युती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं