राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरतंय? विकास फसल्याने सेना-भाजपला 'राम मंदिरा'चा आधार? आपलं मत नोंदवा

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या भेटी मागे हिंदुत्वाचा मुद्दा आणि भाजपला शह अशी कारणं पुढे केली जात असली तरी वास्तव हे दुसरंच असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. राज्य सरकारमध्ये तसेच केंद्रात १२-१३ मंत्रिपद उपभोगणाऱ्या शिवसेनेची नेहमीच एक बोंब राहिली आहे की, आमच्या मंत्र्यांची तसेच आमदारांची कामं मार्गी लावली जात नाहीत. परंतु नुकतंच सामना’ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते सत्तेचा अनुभव घेण्यासाठी सत्तेत सामील असल्याचं उत्तर दिल आहे. वास्तविक गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या मंत्र्यांचा कार्यकाळ हा विकासशुन्य असाच म्हणावा लागेल.
त्यामुळे आगामी निवडणुका विकासाच्या मुद्यावर लढवायच्या म्हटल्यावर मतदाराला सत्ताकाळात शिवसेनेची आणि शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांची नक्की कामगिरी तरी काय आणि त्यांच्या डझनभर मंत्र्यांनी राज्यातील कोणती विकास कामं केली असं मतदारांनी विचारल्यास काय उत्तर देणार हा पक्षापुढे प्रश्न असणार. तसेच २०१४ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध केलेला विकासाचा जाहीरनामा कोराच राहिल्याची शिवसेनेला जाणीव नसणार असा विषय नाही.
दुसरीकडे शिवसेनेचा पारंपरिक मतदार असलेला कोकणी माणूस हा शिवसेनेच्या नाणार रिफायनरी संबंधित भूमिकेमुळे शिवसेनेवर प्रचंड नाराज असलायचं चित्र संपूर्ण कोकणात पाहायला मिळत आहे. त्यात हाच कोकणी माणूस मुंबई तसेच ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. दुसरीकडे मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात मुंबई मधील कोळीवाड्यांवर अन्याय झाल्याची भावना समस्त कोळी समाजात आहे आणि हा सुद्धा शिवसेनेचा पारंपरिक मतदार आगामी निवडणुकीत नाराजी प्रकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात शिवसेना नैतृत्वाकडून सत्ताकाळ हा केवळ भाजपवर टीका करण्यात व्यर्थ गेल्याने आणि संपूर्ण चार वर्ष सत्तेत असून सुद्धा विरोधी पक्षाची भूमिका घेतल्याने मराठी मतदाराची नाराजी वाढताना दिसत आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना’ला दिलेली मॅरेथॉन मुलाखत नीट बघितल्यास सर्व विषय ठरवून विचाराने आणि उत्तर देणे असं असल्याचं स्पष्ट जाणवतं. त्यातले प्रश्न हे आकस्मित पणे विचारले गेले किंवा नैसर्गिक उत्तर दिली गेली अशी शक्यता दिसत नाही. जर त्यामधील एका मुद्यावर बोलायचे झाल्यास संजय राऊत स्वतःच बोलत आहेत की उत्तर भारतातील लाखो लोकांची इच्छा आहे की, निदान उद्धव ठाकरे यांनी तरी अयोध्येला यावं आणि रामाचं दर्शन घ्यावं. वास्तविक अयोध्येतील राम मंदिर अजून बनलेलंच नाही, मग भेटीमागचं कारण काय? ते सुद्धा निवडणुका जवळ येताच?
या राजकारणा मागील थेट राजकीय गणितं अशी की, उत्तर प्रदेशात राम मंदिराच्या नावाने भेट द्यायची आणि मुंबई तसेच ठाणे व इतर आसपासच्या शहरातील उत्तर प्रदेशातील लाखो लोकांना भावनिक दृष्ट्या शिवसेनेकडे आकर्षित करायचं हा त्या मागील मूळ उद्देश दिसतो आहे. त्यात भाजपशी युती न झाल्याने गुजराती मतं मिळणार नाहीत. त्यात येत्या निवडणुकीत मराठी मतदारांकडून फटका बसणार याची त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि तीच पोकळी भरून काढण्यासाठी हिंदुत्वाच्या आणि अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने उत्तर प्रदेशाला भेट देणं आणि महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीय मतदाराला शिवसेनेकडे आकर्षित करणे हे त्यामागील मूळ कारण असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुक लढवून काय नाचक्की झाली याची आकडेवारी सार्वजनिक उपलब्ध आहे. तसेच ‘उत्तर भरतीयोंके सन्मान मे शिवसेना मैदान मे’ असे नारे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी चक्क उत्तर भारतीय संमेलनं भरवून शिवसेनेकडून दिले गेले आहेत. त्यामुळे या उत्तर भारत भेटीमागे मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली तसेच मुंबईच्या आसपास असलेल्या शहरातील उत्तर भारतीय मतं भावनिक दृष्ट्या आकर्षित करणं हे मुळ कारण आहे.
दुसरं म्हणजे त्याच मॅरेथॉन मुलाखतीत वाराणसी भेटीचा सुद्धा उल्लेख आहे जो नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे, ज्याला उत्तर देताना गंगा नदी किती साफ झाली हे मला सुद्धा पाहायचं आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. परंतु मुंबई महानगर पालिकेची सत्ता सलग २५ वर्ष हातात असताना, याच मुंबई शहरातील महत्वाची समजली जाणारी संपूर्ण मिठी नदी गटारात रूपांतरित झाल्याची त्यांना कदाचित कल्पनाच नसावी.
मागील संपूर्ण निवडणूकीत मतदाराला विकासाची आश्वासनं देऊन सत्ता काबीज केली आणि संपूर्ण सत्ताकाळ विकासशुन्य कारभारात व्यर्थ गेल्याने, मतदारासमोर राम मंदिर सारखे भावनिक मुद्दे पुढे करून शिवसेना आणि भाजप आगामी निवडणूक लढवतील हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच भाकीत खरं होताना दिसत आहे असच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं