पहिली केंद्रात-राज्यात सत्ता उपभोगून घेतली, निवडणुका येताच "पहिले मंदिर फिर सरकार"चा नारा?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानिमित्त पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे नेत्यांची सेनाभवन येथे तयारीचा आढावा आला, ज्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. दरम्यान, यावेळी पक्षाचे राज्यातील सर्व जिल्ह्याप्रमुख,संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख सुद्धा उपस्थित होते.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर सत्ताकाळात केलेल्या विकासावर बोलण्यापेक्षा पक्षाने पूर्णपणे धार्मिक मुद्यांवर लक्ष केंद्रित केल्याने लोकांकडून सुद्धा संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्रात आणि राज्यात मिळून डझनभर मंत्रिपद उपभोगणाऱ्या शिवसेनेने आता नवा नारा दिला आहे. “हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार” असा नारा शिवसेनेने तयार केला आहे. वास्तविक पहिल्यांदा केंद्रात आणि राज्यात संपूर्ण सत्ता उपभोगून आता निवडणुकीच्या तोंडावर “पहिले मंदिर फिर सरकार” अशी घोषणा म्हणजे मतदाराची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.
अयोध्या दौऱ्यातील पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येत्या २४ व २५ रोजी शिवसेना महाआरती, रॅली आणि अन्य मार्गांचा प्रभावी अवलंब करून आणि जनजागृती करून अयोध्येत राम मंदिराची आठवण या निमित्याने झोपलेल्या कुंभकर्णाला करून देणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं