पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या आढाव्याबाबत खासदारांनी मौन बाळगलं?

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोतोश्रीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीला अनेक खासदारांनी हजेरी लावली खरी, परंतु त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे पक्ष प्रत्येक खासदाराच्या मतदार संघाचा आढावा घेतल्या शिवाय स्वबळ की एकत्रित निवडणुका याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आढावा बैठकीला येणारे खासदार कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत.
मातोश्रीवरील या बैठकीला खासदार संजय राऊत, आमदार एकनाथ शिंदे, आमदार दिवाकर रावते, आमदार रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, भावना गवळी, आनंदराव अडसूळ आणि कृपाल तमाने हे ४ खासदार सुद्धा उपस्थित होते. आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती असेल? अशा सर्व बाजू पक्षप्रमुख पडताळून पाहत आहेत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये शिवसेना स्वबळावर वाढल्यास पक्षाला मोठा फटका पडणार असल्याचं त्या सर्व्हेमध्ये मत नोंदवण्यात आलं आहे. शिवसेना स्वबळावर लढल्यास राज्यातील एनडीएच्या जागा तर घटातीलच, परंतु शिवसेनेच्या वाट्याला लोकसभेच्या केवळ २ जागा येतील असा धक्कादायक निष्कर्ष त्यात नोंदवण्यात आला आहे आणि त्यामुळे शिवसेना स्वबळाबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं