शरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही: उद्धव ठाकरे

मुंबई : काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात पुणेरी पगडी नाकारुन पागोट्याला पसंती देण्याची प्रकाराने राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर अनेक स्थरातून टीका करण्यात आली होती. पवारांच्या त्या कृतीचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमा दरम्यान समाचार घेतला आहे.
पवारांच्या त्या पगडी राजकारणावर तोंडसुख घेताना उद्धव ठाकरे यांनी, शरद पवारांकडे डोकं नावाचा प्रकार नाही अशी खरमरीत टीका केली आहे. तसेच पगड्यांचं राजकारण करु नका, असा सल्ला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना दिला आहे. दरम्यान पवारांवर टीकेची झोड उठवताना उद्धव ठाकरे म्हणले की ‘पगड्यांपेक्षा त्या परिधान करणाऱ्या व्यक्तींच्या विचारांनी पुढे जायला हवं. लोकमान्य टिळकांनी ‘इंग्रज सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला होता. परंतु पवारांना तोदेखील प्रश्न विचारता येत नाही. कारण डोकं ठिकाणावर असायला आधी डोकं असावं लागतं. पवारांना डोकं नावाचा प्रकारही नाही,’ अशी बोचरी टीका शिवसेना पक्ष प्रमुखांनी पवारांचं थेट नाव घेऊन केली.
तसेच याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोदींवर टीका करताना म्हटलं की, ‘सध्या देशातील वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांना अघोषित आणीबाणीचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं. देशात दुसरी आणीबाणी येत आहे, ती मोडून काढा, असं आवाहन शिवसेना प्रमुखांनी केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं