उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच

मुंबई : सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.
नुकतच देशातील बलात्कारांच्या घटनांवरून बॉलिवूडमधील कोरिओग्राफर सरोज खान यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन वादग्रस्त विधान केल्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
त्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं अगदी संसददेखील याला अपवाद नाही असं धक्कादायक विधान केलं होत. त्यांच्या या विधानाने चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. त्याचाच धागा पकडून आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रसिद्ध झालेल्या संपादकीय मधून सध्याच्या भाजप सरकारवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.
देशाच्या संसदेत महिला खासदार आहेत तसेच महिला अधिकारी व कर्मचारीही आहेत, पण ‘कास्टिंग काऊच’ची किंकाळी रेणुका चौधरींनी मारली आहे. रेणुका चौधरींच्या कास्टिंग काऊच संबंधित वक्तव्याने त्यांची किंकाळीने फार तर त्यांच्या काँग्रेस पक्षात खळबळ माजू शकेल. पण सध्याच्या भाजप सरकारमध्ये अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच चालले आहे असं विधान आजच्या संपादकीय मध्ये करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात निर्भय असं कोणीच नसल्याने दडपण सहन करीत अनेकांचे जगणे सुरू आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं