मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा आरक्षण द्या: उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांची बैठक आज मुंबईमध्ये मातोश्रीवर दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षातील आमदार तसेच खासदारांची मतं जाणून घेतली असून त्यानुसार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
त्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा आरक्षण द्या असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सध्याच्या आरक्षणाला हात न लावता, आर्थिक निकषावर आरक्षण द्या परंतु सध्याचं आरक्षण रद्द करु नका अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान याच विषयावर पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा मराठा समाज शांततेने आरक्षणाची मागणी करत होते तोपर्यंत लक्ष दिलं नाही. पण आज मराठा समाज आक्रमक झालाय म्हणून त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी तातडीने अधिवेशन बोलवा आणि घटनादुरुस्ती करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापल्याने सर्वच पक्ष खडबडून जागे झाले आहेत असं चित्र सर्वच पक्षांच्या बाबतीत दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं