बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं: उद्धव ठाकरे

मुंबई : बेस्ट कामगारांनी तब्बल ८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. मात्र मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात भारतीय जनता पक्षाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शहरभर बोंबाबोंब करण्यास सांगितले, अशा रोखठोक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.
‘बेस्ट’सारखे लोकउपयोगी उपक्रम पूर्वी फायद्यात होते आणि त्यास बरीच कारणे आहेत. फक्त ट्रेन आणि बेस्ट हीच २ मुख्य साधने प्रवासासाठी सामान्यांना उपलब्ध होती. आज घरटी २ गाड्या आहेत. ओला, उबेर, मेट्रो, मोनोरेलने नवे मार्ग निर्माण केले. त्याचा सुद्धा आर्थिक फटका ‘बेस्ट’ला बसलाच आहे. या प्रचंड तोट्यात असलेल्या उद्योगाचे खासगीकरण करून विषय संपवायचा, की असलेलं टिकवून मराठी लोकांच्या नोकऱ्या वाचवायच्या याचे उत्तर आधी फुकटची ‘राव’गिरी करणाऱ्यांनी व त्या रावांचे पडद्यामागून सूत्रसंचालन करणाऱ्यांनी द्यावे.
सामान्य जनता रंक आणि खाक झाली तरी चालेल, पण असल्या नेत्यांची ‘राव’गिरी मात्र चिरंतर चालत राहिली पाहिजे. आम्ही या विचारांचे नाही. परंतु, ज्यांना बोंबलायचे, त्यांनी खुशाल बोंबलावे असे सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं