बाजीप्रभू, तानाजी मालुसरेंच्या चरणांची धूळ व्हावी असं कोणी आहे का? निवडणुकीच राजकारण?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आणि रयतेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या कोणत्याही मावळ्याशी एखाद्याची तुलना करावी हे तर लांबच, पण त्यांच्या चरणांची धूळ व्हावी इतकी लायकी असलेलं तरी कोणी उरलं आहे का ? केवळ निवडणुकीची आकडेवारी, जातीय समीकरण आणि विशिष्ठ समाजाच्या मतांना डोंळ्यासमोर ठेऊन, कोणत्याही व्यक्तीची तुलना ही स्वराज्यासाठी लढून स्वतःच रक्त आठवणाऱ्या महाराज्यांच्या कोणत्याही मावळ्यांशी करण कितपत स्वीकारावं ? कारण असाच प्रकार घडला आहे शिवसेनेकडून.
कारण सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची तुला थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी करण्यात आली आहे. कालच संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त दाव्याने त्यांच्यावर टीकेचा तुफान भडीमार झाला असताना, त्यानंतर शिवसेनेने संभाजी भिडे हे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले आहे. स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी कधी कोणाची जात बघितली नाही. परंतु सध्याच्या राजकारणाची एकूण गणितच जातीवर अवलंबून असल्याने असले केविलवाणे प्रयोग केले जात आहेत अशी चर्चा रंगली आहे.
नक्की ‘सामना’ मुखपत्रात काय म्हटलं आहे?
“हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. काही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत.”, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
“भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे.” असे म्हणत, ‘सामना’त पुढे म्हटले आहे की, “कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके–४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच.”
समाज माध्यमांवर शिवसेनेवर टीकेचा तुफान भडीमार होताना दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं