राम मंदिराचा विषय हिंदुत्ववाद्यांनीच गुंडाळून ठेवला: शिवसेना

मुंबई : अयोध्येत राम मंदिराबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून होत असलेला वेळकाडूपणा आणि RSS आणि विहिंपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलेल्या भूमिकेवर शिवसेनेने सामनामधून टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिराचे काय ते पाहू, असे बोलणे म्हणजे शरयू नदीत बलिदान देणाऱ्यांचा अपमान असल्याचं सामनात म्हटलं आहे.
देशात राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून बाजूला ठेवलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राममंदिरचा मुद्दा केंद्रातील मोदी परिवाराला अडचणीचा ठरू नये. यासाठी संघ परिवाराने ही भूमिका स्वीकारली आहे काय?, असा खडा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. आम्ही अयोध्येत जाऊन येताच धर्मसभा आणि हुंकार सभांचा मोठा जोर वाढला. दरम्यान, परिस्थिती अशी असली तरी राममंदिर उभारणीच्या श्रेयवादात शिवसेनेला पडायचे नाही. श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा, असे थेट आवाहन सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने केले आहे.
विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिराचा विषय टाळावा ही त्यांची मजबुरी असेल किंवा अंतर्गत बाब. पण अयोध्येतील राममंदिराचा विषय मात्र कुलूपबंद केला जातोय.
वाचा सविस्तर…https://t.co/fz9Fo3tcrV— Saamana (@Saamanaonline) February 8, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं