प्लास्टिक आडून, राज ठाकरेंना चुचकारून २०१४ सारखी व्यूहरचना आखली जात आहे? सविस्तर

मुंबई : रामदास कदमांची आजची प्लास्टिक बंदीच्या विषयाला विसंगत प्रतिकिया पाहिल्यास प्लास्टिक आडून राज ठाकरें विरुद्ध २०१४ सारखी फलदायी ठरलेली व्यूहरचना आखली जात आहे. रामदास कदमांची वक्तव्य पाहिल्यास त्यामागील बोलविते धनी दुसरेच कोणी असल्याचा अंदाज येतो. शिवतीर्थावरील सभेपासून ते इतर सर्वच ठिकाणी राज ठाकरे भाजपला लक्ष करत आहेत. तसेच शिवसेनेला ते पूर्ण पणे दुर्लक्षित करत असल्यामुळे सेनेच्या अडचणी वाढत होत्या.
२०१४ मधील निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेला लक्ष केल होत. त्या टीकेमुळे राज ठाकरे हे शिवसेनेला जाणीवपूर्वक लक्ष करून त्याचा फायदा इतर पक्षांना करून देत आहेत असा संदेश शिस्तबद्ध पसरवून मराठी माणसाच्या मनात मनसेबद्दल द्विधा मनस्थिती निर्माण केली आणि भावनिक फायदा उचलत यश पदरात पाडून घेतलं. राज ठाकरेंनी टीका केल्यामुळे शिवसेनेला त्याचा भावनिक फायदा होतो याचा शिवसेनेला अनुभव आहे.
परंतु राज ठाकरे सुद्धा तितकेच चाणाक्ष आणि मुरलेले राजकारणी आहेत. २०१४ नंतर त्यांनी अपयशाच्या विविध कारणांचा अभ्यास केला नसणार असं समजणं मूर्ख पनाचं ठरेल. त्याचाच प्रत्यय असा की मागील अनेक महिन्यांपासून ते केवळ भाजपला लक्ष करत आहेत आणि शिवसेनेला पूर्ण पणे दुर्लक्षित करत आहेत. वास्तविक राज ठाकरेंचा सेनेला अधिक त्रास याच विषयाचा होत आहे की ते शिवसेनेवर टीका करण टाळत आहेत.
वास्तविक शिवसेनेचा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून ४ वर्षातील कार्यकाळ बघितल्यास त्याला विकासशुन्य असच म्हणावं लागेल. आपल्या १२-१३ मंत्र्यांच्या विकास कामांचा मतदाराने हिशेब मागितल्यास सेना नैतृत्वाकडे मुद्दाच नसेल, कारण संपूर्ण सत्तेचा कार्यकाळ हा मित्रपक्ष भाजपवर टीका करण्यात आणि राजीनामा नाट्यात व्यर्थ गेला आहे. त्यात उद्या सत्ताधारी पक्ष म्हटल्यावर ‘अँटी इंकमबंसी’ सुद्धा सेनेसाठी डोकेदुखी ठरू शकते.
सत्ताकाळातील विकासशुन्य कारभार आणि त्यामुळे आपल्या पक्षाबद्दल मतदाराच्या मनात बनत असलेली नकारात्मक भूमिका जर पुन्हा बदलायची असेल तर भावनिक मुद्यांना हात घालून जाणीवपूर्वक होकारात्मक वातावरण निर्मिती करण्याची नीती ही सर्वश्रुत झाली आहे. कारण त्यामुळे मतदाराच्या डोक्यातून विकास कामं निघून जातात आणि संपूर्ण वातावरण भावनिक करून इतर महत्वाच्या मुद्यांना शिस्तबद्ध बगल देऊन राजकीय फायदा लाटण्याचे तंत्र सर्रासपणे वापरलं जात.
आज २०१४ मधील तेच फलदायी ठरलेलं अस्त्र शिवसेना राज ठाकरेंच्या विरुद्ध ‘प्लास्टिक आडून’ आणि रामदास कदमांच्या तोंडून संदर्भ आणि विसंगत प्रतिक्रिया देऊन उगारत आहे. जाणीव पूर्वक अशा प्रतिक्रिया द्यायला सांगितल्या जात आहेत, ज्यामुळे राज ठाकरे संतापतील आणि आदित्य ठाकरेंच्या चांगल्या उपक्रमांना ते आडकाठी आणत आहेत अशी हवा निर्मिती केली जाईल जे वास्तविक खोटं आहे. कारण याआधी आदित्य ठाकरेंना पुढे करून, मुंबई महापालिकेत शिक्षण क्षेत्रात आधुनिक शिक्षणाच्या नावाने महापालिकेतील विद्यार्थ्यांना मोफत ‘टॅब’ वाटपाचा प्रयोग केला जो कालांतराने टॅब खरेदी घोटाळा, टॅबचा दर्जा तसेच अवाजवी किमतीत खरेदी आणि त्याचा थेट व्हिडिओकॉन कंपनीशी जोडलेला संबंध यामुळे गाजला होता. तोच प्रयोग काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीने हळूच बासनात गुंडाळला आणि त्यावर महापालिकेतील नेत्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं, कारण विषय थेट आदित्य ठाकरेंशी संबंधित होता.
प्लास्टिक बंदीच्या प्रयोग यशस्वी होणार की नाही याची खात्री आज कोणीच देऊ शकत नाही. कारण भारतात आणि राज्यात अशा अनेक सरकारी बंदी झाल्या आहेत उदा. गुटखा बंदी व हायवे मार्गावरील दारू विक्री इत्यादी, त्याचं पुढे काय झालं हे सर्वश्रुत आहे. परंतु आदित्य ठाकरेंना केंद्र स्थानी ठेऊन जरी प्लास्टिक बंदी अंमलात आणली असेल तरी त्यांना मोठी प्रसिद्धी द्यायची असेल तर राज ठाकरे हेच मोठे अस्त्र आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. किंबहुना आगामी निवडणुकीपूर्वी याच एका मुद्याची बोंब करून आम्ही सत्ताकाळात काय भरीव कामगिरी केल्याचा प्रचार केला जाऊ शकतो. तसेच भविष्यात भाजपने यात उडी घेऊन, आदित्य ठाकरे नव्हे तर राज्य सरकार प्लास्टिक बंदीसाठी आग्रही होत आणि राज्यसरकारने प्लास्टिक बंदीची अधिसूचना काढली होती असा पवित्रा घेतल्यास, त्याच श्रेय विभागाल जाईल याची सुद्धा भीती आहे. नाणार’च्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला कसं तोंडघशी पाडलं होत हे सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे घाई करण्याशिवाय पर्याय नाही.
त्यामुळे एखाद्या नेत्याला जाणीवपूर्वक चुचकारायच असेल तर ठरवून दिलेली वाक्य प्रसार माध्यमांपुढे सांगितल्या प्रमाणे बोलण्यासाठी रामदास कदम हे पक्षात नेहमीच हुकमाचा एक्का राहिले आहेत याची पक्षाला कल्पना आहे. कारण राज ठाकरे जेव्हा शिवसेनेवर टीका करायचे तेव्हा शिवसेनेला जेवढा त्रास झाला नसेल, तेवढा त्रास त्यांना आज राज ठाकरे शिवसेनेवर टीका करत नसल्यामुळे होत आहे हे स्पष्ट जाणवत आहे.
आज कोणती विधानं रामदास कदमांनी राज ठाकरेंना चुचकारण्यासाठी केली आहेत.
१. काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते?
२. आदित्य ठाकरे पुढे जातील या भीतीनं राज ठाकरे राजकारण करत आहेत.
३. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये
४. राज ठाकरे स्वतःला कोर्टापेक्षा मोठे समजतात काय?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं