सेनेचा प्रादेशिक श्रीमंतीचा विक्रम यंदाही कायम २०१५-१६ मध्ये ६१ कोटी तर २०१६-१७ मध्ये २५ कोटी देणग्या मिळाल्या

मुंबई : मुंबई सारखी श्रीमंत महापालिकेत सत्ता आणि राज्य व केंद्रातील भागीदार शिवसेना हा देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरला आहे. एडीआर ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात शिवसेनेला सर्वाधिक म्हणजे तब्बल २५.६५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर एडीआरनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
मागील वर्षीचा म्हणजे २०१५-१६ चा श्रीमंत प्रादेशिक पक्षाचा मान सुद्धा शिवसेनेलाच मिळाला आहे. मागील आर्थिक वर्षात शिवसेनेला तब्बल ६१.१९ कोटी इतक मोठ्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यात एकट्या व्हिडिओकॉन ग्रुपकडूनच भली मोठी देणगी मिळाल्याची माहिती इलेक्शन कमिशनच्या माहितीत उघड झालं होत. दुसरीकडे शिवसेनेनंतर क्रमांक लागतो तो आम आदमी पक्षाचा त्यांना एकूण २४.७५ कोटी इतकी देणगी मिळाली आहे.
सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्षांच्या यादीत पंजाबमधील शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना २०१६-१७ या आर्थिक वर्षात १५.४५ कोटी इतकी देणगी मिळाली आहे. परंतु शिवसेना सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला असला तरी, २०१५-१६6 च्या तुलनेत त्यांना यंदा मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत ७० टक्क्यांची घसरण झाली आहे. कारण २०१५-१६ मध्ये शिवसेनेला ६१.१९ कोटी देणग्या मिळाल्या होत्या ज्यामध्ये व्हिडिओकॉनचा मोठा वाटा होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं