मनसे'मुळे आमची मत फुटतात हे सेनेचं रडगाणं पालघर, जळगाव व सांगली निवडणुकीत निकाली?

मुंबई : मागील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये शिवसेनेने मराठी मतदाराला मनसे पासून प्रवृत्त करण्यासाठी, मनसेच्या उमेद्वारांमुळे शिवसेनेची मतं फुटतात असा दावा केला होता. परंतु पालघर लोकसभा पोटनिवडणूक, सांगली-मिरज महापालिका आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेनेचा हा दावा पुसला गेल्यात जमा आहे. त्यामुळे या मुद्याचा शिवसेनेला २०१९ मध्ये काहीच उपयोग होणार नाही अशी शक्यता आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या काही दिवस आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालघर’मध्ये भव्य सभा झाली होती आणि त्याला भरगोस गर्दी सुद्धा झाली होती. त्यावेळी एकक्षण असं वाटलं होत की, मनसे सुद्धा आता पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवणार. परंतु प्रत्यक्ष पालघर पोटनिवडणुकीसाठी मनसेने उमेदवार दिला नाही. काही दिवसांनी झालेल्या त्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस असे प्रमुख पक्ष मैदानात होते तरी भाजपने विजय संपादित केला होता.
त्यानंतर काल सांगली-मिरज महापालिका तसेच जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी मनसेने उमेदवार दिले नव्हते, तरी सांगली-मिरज महापालिकेत शिवसेनेला भोपळा हाती लागला. तर दुसरीकडे जळगावच्या निकालात सुरेश जैन सारख्या दिग्गजाने जोर लावला होता आणि पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. परंतु ही निवडणूक पहिल्यादांच शिवसेनेच्या चिन्हावर लढली गेली आणि तिथे सुद्धा शिवसेना आणि सुरेश जैन हे दोघे सुद्धा तोंडघशी पडले आहेत. स्वबळाचा नारा देताना शिवसेनेला भाजपचं बळ मात्र ध्यानात आलं असावं.
जर आगामी लोकसभा आणि निवडणुकीचा विचार केला तर शिवसेनेची अजून एक गोची होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत, मनसेमुळे शिवसेनेच्या उमेदवाराची मतं फुटतात ही आरोळी उठवता येणार नाही. कारण राज्यातील या महत्वाच्या महानगरपालिकेत मनसेने एकही उमेदवार दिला नसताना सुद्धा शिवसेनेचं अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं आहे आणि संपूर्ण सांगली-मिरज’मध्ये तर भोपळा सुद्धा फोडण्यात शिवसेनेला यश आलेलं नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं