गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा संबंध काय? | राणेंना उंचीवरून काय बोलणार? - मनिषा कायंदे

मुंबई, १० सप्टेंबर | गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाच संबंध काय? असा सवाल करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. राणेंना उंचीवरून काय बोलणार?, असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.
गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा संबंध काय?, राणेंना उंचीवरून काय बोलणार? – Shivsena MLA Manisha Kayande criticized union minister Narayan Rane over Ganesh Murti height restrictions :
शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा सणसणीत टोला लगावला आहे. कोकणात आणि मुंबईत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मूर्तीची उंची जेवढी मोठी तेवढे माणसं अधिक लागतात. शिवाय मोठ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्यामुळे गेल्या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीला चरा फुटाची मर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे 10 ते 15 भाविकांमध्ये विसर्जन निर्विघ्नपणे पार पडलं होतं. 20-22 फुटांच्या मूर्ती असतील तर कार्यकर्त्यांचा लवाजमा अधिक लागतो. आता राणेंना उंचीवरून काय बोलणार?, असा चिमटा काढतानाच केंद्रीय मंत्र्यांनी गणपतीच्या उंचीचा आणि कोरोनाचा काय संबंध? असा प्रश्न करणं हे दिवाळखोरीचं लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ही जागतिक महामारी आहे. या विषयाचं गांभीर्य अनेकांना समजलं आहे. दुर्देवाने काही लोकांना समजलं नाही. केंद्र शासनाने कडक सूचना केलेल्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट कायदा हा देशात लागू आहे. तसेच 144 कलम लावण्याचा अधिकार पोलिसांचा आणि शासनाचा आहे. गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. तिसरी लाट आली आहे, असं त्या म्हणाल्या.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Shivsena MLA Manisha Kayande criticized union minister Narayan Rane over Ganesh Murti height restrictions.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं