मनसेवर मतं फोडाफोडीचे आरोप करणारी शिवसेना देशभर भाजपची मत फोडण्यात व्यस्त?

मुंबई : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उमेदवारांचे या हिंदी भाषिक राज्यांमध्ये डिपॉझिट जरी जप्त झाले असले तरी, याच तीन राज्यांमधील भाजपचे ५ आमदार शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे पराभूत झाले आहेत.
दिल्ली ते गल्ली भाजप सोबत सत्तेत सामील असलेली शिवसेना त्याच मित्रपक्षाची मतं फोडण्याचे काम देशभर करत असल्याचं समोर येते आहे. राम मंदिराचा मुद्दा भाजपने सोडल्याने त्यांची मतं फुटत असल्याचं कारण न पटण्यासारखं आहे. परंतु, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राम मंदिराचा विषय सुद्धा चर्चेला नसताना शिवसेनेने या राज्यांमधील निवडणुका लढवल्या होत्या. परंतु मत फोडण्याशिवाय त्याच्या हाताला काहीच लागलं नव्हतं आणि जवळपास सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
महाराष्ट्रात शिवसेना याच मतं फोडाफोडीच्या राजकारणाचा उपयोग मनसेबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करत आली आहे. परंतु शिवसेना नैतृत्वाला किंवा शिवसेना नेत्यांना या विषयावर विचारल्यास ते त्याला ‘पक्ष विस्तार’ असं नामकरण करतात. वास्तविक देशभरात कुठेही निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. तसेच कोणाची मतं फुटतात म्हणून कोणत्यातरी पक्षाने निवडणुकांच लढवायच्या नाही, असं म्हटलं तर ते किती संविधानिक होईल असा प्रश्न येतो.
परंतु, आगामी निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हीच आकडेवारी घेऊन शिवसेना स्वतःच्याच मित्र पक्षाची मतं देशभर कशी फोडत असते हे सभेत मांडल्यास शिवसेनाच तोंडघशी पडण्याची शक्यात नाकारता येत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं