आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची महत्वाची बैठक

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची आज शिवसेना भवनमध्ये महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून सर्व नेतेमंडळींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अगदी लवकरच येऊ घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला आघाडी तसेच शिवसेनेशी संबंधित सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कालच मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी पुढील वर्षाच्या फेब्रुवारी किंवा मार्च’मध्येच लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत दिल्याने सर्वच पक्षात घडामोडी घडण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं