सेनेच्या १२ मंत्र्यांनी काहीच कामं केली नाही, त्यांचा राज्याला काहीच फायदा नाही: सेना आमदार बाळू धानोरकर

नागपूर : शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी काल नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची अक्षरशः धिंडवडे काढले आहेत आणि पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणलं आहे.
शिवसेनेच्या १२ मंत्र्यांवर आरोप करताना धानोरकर म्हणाले की, शिवसेनेच्या राज्यातील १२ मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने देखील जनहिताची कामं केलेली नाहीत. जिल्ह्याची कामं तर सोडा त्या मंत्र्यांनी साधी स्वतःच्या मतदार क्षेत्रातील सुद्धा विकासाची कामं केलेली नाहीत. तसेच हे मंत्री शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांना खूप वाईट वागणूक देत आहेत. त्यांच्यामुळे एकासुद्धा कार्यकर्त्याचं समाधान झालेलं नाही आणि ते मंत्री एखादा मेळावा सुद्धा घेत नाहीत. तसेच भद्रावती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वेळ देतात, परंतु प्रत्यक्ष प्रचाराला येतच नाहीत असे विभागीय मेळाव्यात सडकून आरोप केले.
उपस्थितांना संबोधित करताना धानोरकरांनी आवाहन दिलं की, शिवसेनेच्या १२ मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने जरी काम केलं असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. तसेच शिवसेनेचे मंत्री भाजप सोबत संधान बांधून आहेत. त्यामुळे शिवसेना आत्ताच सत्तेतून बाहेर नाही पडली तर आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे आपण निवडणूक लढण्याच्या लायकीचे राहणार नाही असा संदेश वजा इशारा पक्ष नैतृत्वाला दिला आहे. आपल्या पक्षाचं नियोजन शून्य असल्यामुळे आपण अधोगतीला जात आहोत असं आमदार बाळू धानोरकर भर मेळाव्यात बोलले आणि सर्वानाच चक्रावून सोडलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं