आगामी निवडणूक - शिवसेनेचं 'जय उत्तर प्रदेश', यूपीत लढवणार लोकसभेच्या २५ जागा

मुंबई: दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सामील असलेली शिवसेना भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी असतात. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशातलं सर्वात मोठं तसेच अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेल्या यूपीत इतर स्थानिक मित्र पक्षांसह लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या कानावर आलं आहे. त्यासंबंधित लवकरच अधिकृत घोषणा शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात स्थानिक राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं यूपीत पक्षविस्तार करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यात विशेष करून उत्तर प्रदेश, बिहार, जम्मूमध्ये लोकसभा निवडणूकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच इतर राज्यांमध्ये सध्या शिवसेनेकडून स्थानिक मित्रपक्षांचा शोध सुरू आहे.
तसेच यूपीत भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुद्धा खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान, त्या स्थानिक पक्षांच्या मदतीनं यूपीत २५ जागांवर शिवसेना उमेदवार निश्चित करणार आहे असं समजते. त्यात सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांच्यासोबत आमच्या अनेक बैठका झाल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं