राज्याच्या अस्मितेसाठी टीडीपी'चा मोदी सरकारविरोधात 'अविश्वास' ठराव, तर शिवसेनेचा 'विश्वास'

नवी दिल्ली : देशभरातील विरोधक मोदी सरकार विरोधक अविश्वास ठरावा दरम्यान एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले असताना शिवसेनेचा भाजपला विरोध हा केवळ कागदावरच असल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे. कारण शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहाव म्ह्णून पक्षाने विशेष काळजी घेतली आहे.
आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने अमान्य केल्याने चंद्राबाबूंनी राज्याप्रती असलेल्या अस्मितेमुळे तडकाफडकी केंद्र सरकार आणि एनडीए’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे चंद्राबाबू नायडू तितक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट सर्व भाजप विरोधकांशी संपर्क साधून मोदी सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्याला अखेर सभापतींनी मान्यता दिली.
परंतु भाजप आणि मोदींवर संधी मिळताच टीका करणाऱ्या शिवसेनेबद्दल साशंकता होती. तसेच या ठरावावेळी शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार हे गुलदस्त्यात होते, पण आता शिवसेना विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावावेळी लोकसभेत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहाव म्ह्णून पक्षाने विशेष काळजी घेतली आहे.
लोकसभेतील शिवसेनेचे प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने शिवसेनेच्या सर्व खासदारांना लिखित व्हीप जारी करण्यात आल्याने शिवसेनेची भाजप विरोधी भूमिका ही केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं