सेनेच्या नगरसेवकांनी शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमचा पाठिंबा मागितला, ऐकवली ऑडिओ क्लिप

अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनीच माझ्याकडून पाठिंबा मागितला, त्यामुळे त्यांच्याच विनंती आणि मागणीनुसार मी शिवसेनेला मतदान केलं असं स्पष्टीकरण शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने प्रसार माध्यमांशी संबंधित विषयावरून संवाद साधताना दिलं आहे.
दरम्यान, महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यानंतर सभागृहात छिंदम याला मारहाण झाल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. छिंदम हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे तो कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार त्याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी तिथे धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना छिंदम म्हणाला, बाळासाहेब बोराटे यांनी मला मतदान करण्याची विनंती केली. इतकंच नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मतदान करण्यास सांगितले. त्या सर्वांचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिग आहे. दरम्यान, सभागृहात मतदानावेळी मी बोराटे यांना मतदान करत असताना मला रोखण्यात आले. माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यावेळी केला. परंतु, हात उचलणारे नगरसेवक पळकुटे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे छिंदम याने सांगितले. शिवसेनेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं