भाजपकडून शत्रुघ्न सिन्हांवर कारवाईचे संकेत, लवकरच ‘खामोश’ करणार

नवी दिल्ली : कोलकाता येथे विरोधकांच्या महारॅलीमध्ये शनिवारी अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी, खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत मोदींनाच आवाहन दिलं आणि स्वपक्षा विरोधात रणशिंग फुंकले होते. मागील अनेक वर्षांपासून सिन्हा स्वपक्षाच्या आणि विशेष करून मोदींच्या विरोधात रान पेटवत आहेत.
परंतु काल त्यांच्या कोलकाता येथील हजेरीनंतर भाजपमध्ये संतापाची लाट आहे आणि त्याच्यावर कारवाई करून पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय अंतिम टप्यात आहे असं वृत्त प्रसार माध्यमांकडे आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर सिन्हा यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली जाईल असे वृत्त आहे. यावेळी सिन्हा यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली आहे, त्यांनी त्यांची सीमा ओलांडली आहे आणि ते केवळ संधीसाधू आहेत’, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं