निवेदन कसे स्वीकारावे माहित नसलेल्या तावडेंकडून प्रियंका गांधींची शूर्पणखेशी तुलना

भिवंडी : सध्या प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरल्यासाखे दिसत आहेत. कारण तशाच काहींच्या प्रतिक्रिया भाजप नेते मंडळी आणि मंत्र्यांकडून येऊ लागल्या आहेत. राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नुकतेच काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामध्ये भेटीसाठी आलेल्या सामान्य लोकांकडून ते कशा प्रकारे आणि रुबाबात निवेदनं स्वीकारतात त्याचा प्रत्यय आला होता.
आता पुन्हा त्याच विनोद तावडे यांनी प्रियांका गांधी यांच्या बाबतीत एक असभ्य तुलना केली आहे. विनोद तावडे म्हणाले की, ‘रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता राहुल गांधी यांनी सुद्धा प्रियंका गांधींना प्रचारात उतरविले असून त्यांना सुद्धा पुन्हा पराभवालाच सामोरे जावे लागेल. पुढील काही वर्षांनी प्रियंकांचा मुलगा देखील प्रचारात उतरलेला आपणास पाहावयास मिळेल, अशी टीका राज्याचे शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भिवंडी येथे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत केली.
भिवंडी तालुक्यातील अंजूर येथे ठाणे व पालघर विभागांतील भिवंडी, कल्याण, पालघर व ठाणे या चार लोकसभा मतदारसंघांतील शक्तिप्रमुखांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. विरोधकांवर आणि विशेष करून महिलांवर भाष्य करताना भाजपच्या नेत्यांची अनेकवेळा विचारांची पातळी घसरताना दिसत आहे आणि त्यातीलच हे अजून एक उदाहरण म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं